गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जुलै 2019 (16:46 IST)

तब्बल २७ कोटीच्या ५८ किलो सोन्याची चोरी

27 crores gold theft of 58 kg
औरंगाबादमधील वामन हरी पेठे ज्वेलर्समधून तब्बल २७ कोटी रुपयांचे  ५८ किलो सोने चोरीस गेले आहे. अर्धा क्विंटल सोने चोरीला गेले आहे. इतक्या मोठ्या सोन्यावर डल्ला मारल्याप्रकरणी वामन हरी पेठे ज्वेलर्सचा मॅनेजरसह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
क्रांती चौक पोलीस ठाण्यात सर्वांविरोधात  गुन्हा दाखल झाला. औरंगाबादच्या समर्थनगर परिसरातील वामन हरी पेठे शाखेतून हे सोने चोरीला गेले. ही घटना वर्षभरापुर्वीची असल्याची माहिती असून आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. इतक्या मोठ्या प्रमाणावर सोने चोरी झाल्याने मॅनेजरवर संशयाची सुरी बळावली होती. त्याची कसून चौकशी सुरु होती.