शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जुलै 2022 (11:42 IST)

अमरावतीमध्ये भीषण अपघातात 6 जण जागीच ठार

काळ  कधी आणि कुठून येईल हे सांगता येणं  अशक्य आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा बहिरम मार्गावर  दुचाकी आणि इनोव्हा कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 6  जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाईकवरून दोघेजण जात असताना भरधाव येणाऱ्या इनोव्हा कारने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तरुण पुलावरून खाली फेकला जाऊन त्याचा मृत्यू झाला.या अपघातात कारचालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार अपघातग्रस्त झाली. या कार मध्ये पाच जण प्रवास करत असल्याची शक्यता वर्तवली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघाताची नोंद केली आहे. तसेच स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.