मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 जुलै 2020 (09:40 IST)

एकाच दिवसात पुण्यात ९०३ रुग्ण आढळले, तर १४ रुग्णांचा मृत्यू

903 patients
पुणे शहरात काल दिवसभरात नव्याने ९०३ रुग्ण आढळल्याने, २६ हजार ७७ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर दिवसभरात १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे काल अखेर ८०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ६०९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे अखेर १६ हजार १८८ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.