1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जानेवारी 2024 (14:49 IST)

29 वर्षाच्या तरुणाने केलं 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी लग्न, मुलगी गरोदर

A 29-year-old man
बाल विवाह कायदेशीर अपराध आहे, तरीही आजही देशाच्या काही भागात बालविवाह केले जाते. असेच प्रकार घडले आहे ठाण्यात येथे एका 29 वर्षाच्या तरुणाने 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी लग्न केलं आहे. ही मुलगी आता गरोदर असल्याचे समोर आले आहे. या तरुणानं अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे सातारा जिल्ह्यातील असून या तरुणाचे लग्न सहा महिन्यांपूर्वी झाले असून ती मुलगी 12 वर्षाची असून अल्पवयीन आहे. या तरुणांन तिच्यावर बलात्कार केला आता ही मुलगी 4 महिन्याची गरोदर आहे. या तरुणावर नवी मुंबई पोलिसांनी पॉक्सोसह बालविवाह प्रतिबंधक कायदयानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
Edited by - Priya Dixit