सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 8 जून 2022 (16:23 IST)

बीड मध्ये 4 मजली इमारत कोसळली

collapse
बीड मधून एक धक्कादायक माहिती येत आहे.बीडमध्ये चार मजली इमारत कोसळूली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असलेल्या दोन इमारतींच्या मधोमध रिकाम्या जागेवर या इमारतीचं बांधकाम सुरु होतं.या दरम्यान हादरा बसून ही चार मजली इमारत  कलली. कोणत्याही क्षणी ही इमारत कोसळेल असे तिथे असलेल्या एका पत्रकाराला जाणवले आणि त्यांनी ही माहिती प्रशासनाला दिली. प्रशासनाने.माहिती मिळतातच हालचाली करत तातडीने इमारती मधील सर्व नागरिकांना सुरक्षित काढलं आणि पाहता -पाहता ही चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही. पत्रकाराच्या प्रसंगावधानाने आणि प्रशासनाने वेळीच नागरिकांना बाहेर काढल्यामुळे मोठी जीवित हानी झाली नाही. आपल्या डोळ्यादेखत आपले घर कोसळताना पाहून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.