1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (14:57 IST)

बस स्थानकात 42 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

A 42-year-old woman was gang-raped at a bus stop in Nasik
नाशिक पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरलं आहे. येथील वणीमध्ये एसटी बस स्टॅण्ड परिसरात एका 42 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रासोबत बस स्थानकात बसली होती. त्यावेळी तेथे आलोल्या चौघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला.
 
पीडित महिला आणि तिचा मित्र बसस्थानक परिसरात बसले असताना तेथे संशयितांनी येऊन धमकी देण्यास सुरुवात केली आणि पीडितेवर रात्री अकरा वाजेच्या सुमारास सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात चार संशयितांविरोधात सामूहिक बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
जीवे मारण्याची धमकी देत या महिलेवर आरोपींनी बलात्कार केला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. चारही संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
 
वणी परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नाशकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी विनयभंगाची घटना घडल्याचं समोर आलं होतं. तर पवननगर भागात एका व्यावसायिक महिलेवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच घडली होती. 
 
दरम्यान आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.