शनिवार, 13 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (07:55 IST)

फडणवीस यांच्याबाबत बदनामीकारक व्हिडीओ युट्यूबवर प्रसारित केल्याबद्दल गुन्हा दाखल

A case has been registered
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर असलेला व्हिडिओ युट्युबवर प्रसारित केल्याबद्दल वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज दाखले (रा. तापकीरनगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत 37 वर्षीय महिलेने पुण्यातील  वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मार्च रोजी आरोपी युवराज दाखले याने युट्युबवर राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामी करणारा मजकूर असलेला व्हिडिओ प्रसारित केला. प्रसारित केलेल्या व्हिडिओबाबत कुठल्याही प्रकारचा पुरावा दाखले याच्याकडे नसताना हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. यामुळे फिर्यादी महिला कार्यकर्त्या आणि पक्षातील इतर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असंतोष आणि रोष निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.