शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (21:19 IST)

पिचड यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

A case has been registered against Pichad in Nashik पिचड यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखलMaharashtra News Regional Marathi News In Webdunia Marathi
माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनेने पिचड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याआधी आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार करत फिर्यादी सुनेनं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे पोलीस सुरक्षा मागितली होती. या प्रकरणात पिचड यांच्याविरोधात त्यांच्या सुनेने गंभीर आरोप केले आहेत. मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पिचड यांच्यावर करण्यात आला आहे. पिचड यांच्या सुनेने आता पंचवटी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. कलम 498, 306, 406, 324, 504, 506, 468, 471 अन्वये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.