शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जून 2024 (09:19 IST)

महायुतिमध्ये उठला मतभेद, अजित पवारांच्या NCP ने केले मुस्लिम आरक्षणचे समर्थन

ajit panwar
अजित पवारांची NCP ने मुस्लिम आरक्षणचे समर्थन केले आहे. पार्टीचे नेता सूरज चव्हाण म्हणाले की, मुस्लिमांना वेगळे आरक्षण मिळायला हवे.
 
लोकसभा निवडणूक 2024 च्या परिणाम नंतर हळू हळू महायुति मध्ये मतभेद समोर येतांना दिसत आहे. महायुति आणि अजित पवारांची एनसीपी मध्ये आता मुस्लिम आरक्षणच्या मुद्दयांवर मतभेत समोर येतांना दिसत आहे. एनसीपी नेता सूरज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना वेगळे आरक्षण मिळायला हवे. एनसीपी चे नेता आणि महायुति गठबंधनच्या इतर नेत्यांमध्ये यापूर्वीही जबाब बाजी सुरु होती. 
 
काय म्हणाली एनसीपी?
मुस्लिम आरक्षणचे समर्थन करत एनसीपी नेता सूरज चव्हाण म्हणाले की, एनसीपीची भूमिका नेहमी मुस्लिमांप्रती सकारात्मक होती. जरी आम्ही महायुतीचा भाग असलो तरी देखील जर मुस्लिमांवर अन्याय झाला तर त्या विरोधात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आवाज उठवेल. सूरज चव्हाण म्हणाले की, मुस्लिमांना आरक्षण मिळायला हवे. पण ओबीसी कॅटेगिरी मध्ये नाही कारण ओबीसी हे जातिगत आरक्षण आहे. ते म्हणाले की मुस्लिमांना वेगळे आरक्षण मिळायला हवे.
 
गेल्या बुधवारी शिवसेनेचे नेता रामदास कदम यांनी बुधवारी एका कार्यक्रमामध्ये अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता, ज्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) ने पलटवार केला होता. एनसीपी ने दावा केला की, त्यांचे नेता अजित पवार यांच्या वेळी महायुति मध्ये सहभागी झाल्याने सत्तारूढ महायुती लोकसभा नवडणुकीमध्ये वाचली.