मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 9 एप्रिल 2022 (16:41 IST)

इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाला पालकांनी चोपले

A teacher was beaten by his parents for molesting a fourth class student  Beed School News In Webdunia Marathi इयत्ता चौथीच्या  विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाला पालकांनी चोपले
फोटो साभार- सोशल मीडिया 
शिक्षक आणि विद्यार्थीच नातं हे खुप आदरणीय असते. पण बीडच्या एका नामवंन्त इंग्रजी शाळेत या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बीडच्या गुरुकुल इंग्लिश स्कूल मध्ये चौथीत शिकणाऱ्या एका चिमुकली सोबत शिक्षकांनी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर पालकांनी शाळेत जाऊन शिक्षकाला बेदम चोपले आणि आम्ही कोणाच्या भरवश्यावर मुलांना शाळेत पाठवायचे असा प्रश्न केला आहे. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप बसविण्यात का आले नाही ? असा प्रश्न देखील पालकांनी केला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत शाळेतील शिक्षकाने गैरवर्तन केले. या घटनेची माहिती मुलीने पालकांना दिली या नंतर शाळेत खळबळ उडाली. त्या नंतर संतप्त पालकांनी शाळेत जाऊन शिक्षकाला जाब विचारून बेदम चोपले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेत शिक्षकाला ताब्यात घेतले .मात्र अद्याप त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. एवढ्याला फी घेऊन देखील मुलांची सुरक्षा घेतली जात नाही. आम्ही कोणाच्या भरवशावर मुलांना शाळेत पाठवायचे ? मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत शाळा प्रबंधन कडून हलगर्जीपणा करण्याचा आरोप पालकांनी केला आहे. आरोपी शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.
या प्रकरणाच्या आरोपी शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. पुढे विध्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याचे आश्वासन मुख्याध्यापकांनी पालकांना दिले आहे.