रविवार, 28 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 14 जानेवारी 2024 (17:17 IST)

गौतमी पाटीलला पाहण्यासाठी तरुणाने जीव धोक्यात टाकला

Popular dancer Gautami Patil
Gautami Patilलोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. ति नेहमी चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी असते. तिच्या कार्यक्रमात नेहमीच गोंधळ असतो. तिचा डान्स बघणाऱ्यांची मोठी गर्दी असते. अनेकदा पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. तिच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ व्हायरल होतात.

तिचा डान्स बघणारे तरुण वर्ग आपला जावं धोक्यात घालताना दिसतात. कधी कधी प्रेक्षक तिच्या ठेक्यावर ताल धरताना दिसतात. तिला बघण्यासाठी  लातूर मध्ये एका तरुणाने चक्क आपला जीव धोक्यात घातला आहे. 
ति एका बिर्याणी हॉटेलच्या उदघाटनाच्या समारंभासाठी लातूरला पोहोचली होती. या वेळी तिला बघणाऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.तिथे पाय ठेवायला अजिबात जागा नव्हती. तिथे तिच्या नृत्याचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते.    

तिथे लोकांची गर्दी असल्यामुळे काही तरुण विजेच्या डीपीवर चढून बसले होते. या डीपी मध्ये विद्युत प्रवाह देखील सुरु होता. हे तरुण चक्क डीपीवर चढून बसले होते आणि त्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा देखील नव्हती. हे तरुण डान्स पाहण्यात गुंग होऊन मोबाईलने फोटो घेत होते. गौतमीला हे कळल्यावर तिने त्यांना खाली येण्याची विनंती केली आणि प्रोग्रॅम थांबवला. 

Edited By- Priya Dixit