शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (09:02 IST)

त्र्यंबकेश्वर मंदिरातील नंदी महाराजाला सुमारे ९ किलो चांदीचा पाट अर्पण

About 9 kg silver jug offered to Nandi Maharaja in Trimbakeshwar temple
पुणे येथील पु.ना. गाडगीळ अँड सन्स यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांच्या वतीने श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील नंदी महाराजाला  सुमारे ९ किलो चांदीचा पाट देव-दीवाळीच्या  शुभ मुहूर्तावर श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानला भेट देण्यात आला. मंदिराचे निर्मिती पासून दगडी चबुतऱ्यावर असणारी नंदी महाराजांची अतिशय सुंदर व सुबक मूर्तीस चांदीचा पाट अर्पण केला आहे. सुंदर नक्षीकाम केलेल्या सदर पाटावर चार कोपऱ्यात बिल्वपत्र, स्वस्तिक, नाग, त्रिशूळ ई. कोरलेले असून, पाटावर चौकोनात कोरलेल्या फुलांच्या नक्षीकामाने नंदी मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे. पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक व त्यांच्या पत्नी सुनिता मोडक यांचे शुभहस्ते सदर पाटाचे श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानचे कोठी कार्यालयात विधिवत पूजन करून नंदी मंदिरात अर्पण करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने चेअरमन विकास कुलकर्णी, तसेच विश्वस्त प्रशांत गायधनी,संतोष कदम, भूषण अडसरे यांनी सदर चांदीच्या पाटाचा स्वीकार केला. ट्रस्टचे चेअरमन कुलकर्णी यांनी मोडक यांचे सदर भेटीबद्धल आभार व्यक्त केले आहेत.