खंडाळा बोगद्याजवळ अपघात, 17 मजुरांचा मृत्यू , 15 जखमी  
					
										
                                       
                  
                  				  साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पोला सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. यामध्ये 17 मजुरांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झालेत. मृत्युमुखी पडलेल्या मजुरांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने टेम्पोमधून जवळपास 32 मजूर प्रवास करत होते. खंडाळा बोगदा ओलांडून पुढे गेल्यानंतर नागमोडी वळणावर टेम्पोला अपघात झाला. या भागात यापूर्वीही काही अपघात घडले होते. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघातात अनेकांचे बळी जात असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.