मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (11:01 IST)

पालघर-माहिम रोडवर अपघात, ५ ठार

accident in palghar
पालघर-माहिम रोडवरील पाटीलवाडी येथे कारचा भीषण अपघात झाला असून  कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. माहिमहून पालघरकडे जात असताना पहाटे चारच्या सुमारास या कारला भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी थेट एका मोठ्या झाडावर जाऊन आदळली. ज्यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात चालकासह कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाच जणांपैकी तीन मृतांची ओळख पटविण्यात आली असून उर्वरित दोघांची ओळख पटविण्याचं काम सध्या सुरु आहे.