मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (08:29 IST)

पाकिस्तानातून गुजरातमध्ये आलेला 315 कोटी रुपयांचा अम्लीय साठा जप्त केला, तिघांना अटक

Acid reserves worth Rs 315 crore seized from Pakistan to Gujarat
गुजरातमध्ये 315 कोटी रुपयांचे हेरॉईन आणि मेथाम्फेटामाइन जप्त केल्याप्रकरणी द्वारका पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. पोलिसांनी शुक्रवारी सलाया शहरातील दोन मच्छिमारांना अटक केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे दोघे मच्छिमार बोटीने अरबी समुद्रात गेले होते आणि आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळील पाकिस्तानी ड्रग विक्रेत्याकडून ड्रग्जची डिलिव्हरी घेत होते.
 
माहिती देताना जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील जोशी यांनी पत्रकारांना सांगितले की, सलीम जसराया (50) आणि इरफान जसराया  (34), दोघेही देवभूमी द्वारका जिल्ह्यातील सलाया शहरातील रहिवासी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्याला सलीम कारा आणि अली असगर कारा बंधूंनी ड्रग्जची डिलिव्हरी घेण्यासाठी कामावर ठेवले होते.
 
 गुप्त माहिती नंतर कारवाई
माहितीनुसार, शेजारील महाराष्ट्रातील ठाणे येथील रहिवासी असलेल्या सज्जाद घोसी याला न मंगळवारी गुप्त माहितीवरून खंभलिया शहरातील एका गेस्ट हाऊस मधून अटक केली. त्याच्या कडून पोलिसांनी 11.48 किलो हेरॉईन आणि 16.6 किलो मेथॅम्फेटामाइनची 19 पाकिटे जप्त केली.  बाजारातील त्यांची एकत्रित किंमत 88.25 कोटी रुपये आहे.
 
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, घोसीने या रॅकेटमध्ये कारा बंधूंचे नाव दिले होते, त्यानंतर बुधवारी किनारपट्टीवरील सलाया येथील त्यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला, ज्यामध्ये 45 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. एकूण, पोलिसांनी सुमारे 57 किलो हेरॉईन आणि 6 किलो मेथाम्फेटामाइन, एकूण 315 कोटी रुपयाचा अम्लीय साठा जप्त केला आहेत. 
 
जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील जोशी यांनी सांगितले की, कारा बंधूंनी ताबडतोब 2 लाख रुपयांना छोटी बोट विकत घेतली आणि पाकिस्तानी ड्रग विक्रेत्यांकडून डिलिव्हरी घेण्यासाठी सलीमला कामावर घेतले. मासेमारीच्या नावाखाली ड्रग्जची डिलिव्हरी करता यावी म्हणून बोट खरेदी करण्यात आली.