बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 9 जानेवारी 2021 (09:12 IST)

पॉर्न क्लिप पाहून शारीरिक संबंध करणे पडले महागात, तरुणाचा मृत्यू

नागपूरमध्ये पॉर्न क्लिप पाहून शारीरिक संबंध करणे एका प्रेमीयुगलासाठी जीवघेणे ठरले आहे. यामध्ये 28 वर्षीय तरुणाचा गळफास लागून लागून मृत्यू झाला आहे. खापरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक लॉजच्या रुमवर प्रेमीयुगल पॉर्न क्लिप बघून वेगळ्या पद्धतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना ही घटना घडली. मयत तरुण विवाहित असून त्याला लहान मुलगा आहे. तरही तो 20 वर्षीय तरुणीसोबत रिलेशनमध्ये होता.
 
या घटनेत प्रेमीयुगलाने खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉज वरील एक खोली बुक केली होती. तिथे गेल्यानंतर दोघांनी शारीरिक संबंध प्रस्तावित केले. यावेळी वेगवेगळ्या पोजिशनमध्ये शारीरिक संबंध प्रस्तावित करताना दोघांनी दोरीचा उपयोग केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले. त्याच वेळी ती दोरी तरुणाच्या गळ्याच्या भवती सुद्धा अवळली गेली. या पोजिशनमध्ये सेक्स झाल्यानंतर ती तरुणी बाथरूम मध्ये गेली असता. तो तरुण खुर्ची सहखाली कोसळला, ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला होता, ज्यामुळे त्याला गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.