गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जानेवारी 2022 (21:26 IST)

अहमदनगर ब्रेकींग: युवक-युवती देवदर्शनाला गेले अन्…

Ahmednagar Breaking: Young men and women go to Devdarshan अहमदनगर ब्रेकींग: युवक-युवती देवदर्शनाला गेले अन्…Marathi Regional News  In Webdunia Marathi
अगडगाव (ता. नगर) येथील कानिफनाथाच्या दर्शनासाठी गेलेल्या युवक-युवतीला दमदाटी करून व दगडाने मारहाण करत लुटल्याची घटना घडली. या मारहाणीत संबंधीत युवक-युवती जखमी झाले आहेत. युवतीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
बुरूडगाव (ता. नगर) येथील राहणारे युवक-युवती अगडगाव येथील कानिफनाथाच्या दर्शनासाठी गेले होते.दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरात थांबलेले असताना तेथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांना दमदाटी करत दगडाने मारहाण केली.
युवतीच्या हातातील अंगठी, कानातील रिंगा काढून घेतल्या. तसेच त्यांच्या दुचाकीवर दगड टाकून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, एलसीबीचे निरीक्षक अनिल कटके, भिंगारचे पोलीस उपनिरीक्षक बेंडकोळी यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास उपनिरीक्षक बेंडकोळी करीत आहे.