शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जानेवारी 2019 (10:15 IST)

४८ पैकी ४४ जागा वाटपावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४४ जागा वाटपावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत होऊन निर्णय झाला आहे. उरलेल्या जागावाटपाचा निर्णयही लवकरच होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेनिमित्त अजित पवार कोल्हापूरमध्ये होते. त्यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल माहिती दिली.
 
ते म्हणाले, ४४ जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असून निर्णय झाला आहे. आता उर्वरित चार जागांचा निर्णय झाला की दोन्ही पक्ष एकत्रितपणे जागावाटपाची माहिती देतील आणि आघाडीची औपचारिक घोषणाही होईल. आघाडीमध्ये कोल्हापूरप्रमाणे साताऱ्याच्या जागेबाबतही काहीशी धुसफूस होती. मात्र, तिथेही आता मनोमिलन झाले आहे. काही लोकांची मागणीच जास्त असल्यामुळे जागा वाटपाचा विषय प्रलंबित राहतो. पण लवकरच त्यावर तोडगा काढला जाईल. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मागितलेल्या १२ जागांच्या मागणीवरही सध्या चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.