मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 जुलै 2021 (09:48 IST)

मुरुड: पूल कोसळला, अलिबाग-मुरुड वाहतूक विस्कळीत

Alibag Murud Kashid Bridge Collapsed
अलिबाग-मुरुड मार्गावरील काशीद येथील जुना पूल काल रात्री ८ वाजता कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एक दुचाकी आणि एक चारचाकी वाहन पुलावरून खाली पडली. वाहनांमधळी 6 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र यात एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. मुरुडकडे जाणारा वाहतूक पर्यायी मार्ग रोहा सुपेगाव मार्गे वाहने वळवण्यात आली आहेत. 
 
रविवारी संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस सुरु असताना मुरुड तालुक्यातील हा 50 वर्षांचा जीर्ण झालेला पूल अतिवृष्टीमुळे कोसळला असल्याचे सांगण्यात येतं आहे. अलिबाग-मुरुड रस्त्यावरील काशिद गावाजवळील नदीवर असलेला हा जुना पूल होता.
 
काशीद येथील हा ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाला असल्याने त्याच्या दुरुस्तीची मागणी काही वर्षांपासून केली जात होती. त्यातच रविवार सकाळपासून मुरुड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत होता. अशात रात्री आठच्या सुमारात जीर्ण झालेला पूल कोसळला. या पुलावरून त्यावेळी जात असलेली एक कार आणि एक मोटरसायकल प्रवाहात कोसळली. उपस्थितांनी कारमधून पाण्यात पडलेल्या लोकांना वाचवण्यात आले. मात्र मोटरसायकलस्वाराचा बुडून मृत्यू झाला. मोटासायकलवरील एक जण सुखरूप बाहेर आला, मात्र एक जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.