शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (07:43 IST)

अमरावती ब्रेकिंग : ब्रेक द चेन संचारबंदीत थोडा बदल

Amravati Breaking
अमरावती जिल्ह्यात १५ मेपर्यंत जारी संचारबंदीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात थोडा बदल करणारे शुद्धीपत्रक जिल्हा प्रशासनाने निर्गमित केले असून, दूध विक्री केंद्रे सकाळी ७ ते ११ या वेळेत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
 
जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुग्ध विक्री केंद्रे, दुग्धालये, डेअरी, दूध संकलन केंद्रे, दुकाने यांना दूध संकलन व विक्री करण्यासाठी सकाळी ७ ते सकाळी ११ दरम्यान परवानगी राहील, असे अपर जिल्हा दंडाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी जारी केलेल्या शुद्धीपत्रकात नमूद आहे.
 
*बँका केवळ अंतर्गत कामासाठी सुरू; ग्राहकांना ऑनलाईन सेवा*
 
सर्व प्रकारच्या वित्तीय सेवा उदाहरणार्थ, बँका, पतसंस्था, पोस्ट कार्यालये, तसेच स्टॉक मार्केटशी संबंधित सेवा या केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार व त्यांना विहित करण्यात आलेल्या वेळेनुसार त्यांच्या अंतर्गत कामासाठी सुरू राहतील. ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरविण्याचे आदेश आहेत.