Widgets Magazine

नटरंगकार ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे निधन

Anand Yadav
Last Modified सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 (09:40 IST)
ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते आजारीच होते. घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी रात्री 10 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली.
आनंद यादव यांचा परिचय

आनंद यादव (नोव्हेंबर ३०, १९३५ - हयात) हे प्रसिद्ध मराठी लेखक आहेत. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या ’संतसूर्य तुकाराम’ या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेत वारकऱ्यांनी हल्लाबोळ करून त्यांना २००९ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यापासून वंचित केले. कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतर देखील वारकऱ्यांचे समाधान झाले नाही. अखेर कादंबरी बाजारातून काढून घ्यावी लागली.


यावर अधिक वाचा :