1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबई: अंधेरीत भिंत कोसळली

Andheri wall collapsed
मालाडमध्ये मुबई महापालिकेने बांधलेली जलाशयाची निकृष्ठ संरक्षक भिंत कोसळून २५ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अंधेरी मालप्पा डोंगरी पेपर बॉक्स इंडस्ट्रीची भिंत कोसळली. या अपघातात एकजण जखमी झाला आहे.


 
महल औद्योगिक परिसरातली ही घटना आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहचल्या असून ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे. या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातात एकजण जखमी झाला आहे.


 
दरम्यान मुंबईत पावसाने जोर धरला असून ठिकठिकाणी पाणी साठलं आहे. तसेच पावसामुळेच ही भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. भिंत कोसळ्यामुळे चार-पाच वाहनांना नुकसान झाले आहेत.