रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जानेवारी 2022 (08:32 IST)

राज्य महिला आयोगात सहा सदस्यांची नियुक्ती; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

महाराष्ट्र राज्य  महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची  नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये ॲड. गौरी नारायणदास छाब्रीया, ॲड. संगीता चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, दीपिका संजय चव्हाण, आभा विजयकुमार पांडे, उत्कर्षा रुपवते या सहा जणींची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  महाराष्ट्र  शासनाच्या राजपत्रात याबाबत 25 जानेवारी 2022 रोजी अधिसूचना प्रसिध्द झाली असून अधिसूचना प्रसिध्दी दिनांकापासून ही नियुक्ती तीन वर्षे कालावधीकरिता आहे.