शनिवार, 20 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 फेब्रुवारी 2023 (12:30 IST)

वयाच्या सत्तरीत जुळले मन, अन् थाटात झालं लग्न

At the age of seventy they met and got married Kolhapur Merriage
प्रेम ही अशी गोष्ट आहे की ते कोणावरही, कधीही आणि कुठेही होऊ शकते. कोल्हापूरात  शिरोळ तालुक्यातील 70 वर्षांच्या एका वृद्धाने त्याच वयाच्या एका वृद्ध महिलेशी लग्न केले आहे. अगदी थाटात हा विवाहसोहळा पार पडला आहे. शिरोळ तालुक्यात 70 वर्षाच्या या लग्नसोहळ्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. शिरोळ तालुक्यात घोसरवाड येथे जानकी वृद्धाश्रमात जोडीदाराच्या निधनानंतर अनुसया शिंदे (70)आणि बाबूराव पाटील (75) गेल्या दोन वर्षांपासून राहत असताना एकमेकांशी ओळख झाली आणि त्यांचे धागेदोरे जुळले. त्यांनी एकमेकांसह आयुष्य घालवण्याचे ठरविले आणि या वयात लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे लग्न दणक्यात वृध्दाश्रमाचे चालक यांनी लावून दिले. शिरोळ येथे या लग्न सोहळ्याची चर्चा सुरु आहे.   
 
Edited by - Priya Dixit