शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

रिक्षा चालकांनी धरले सामान्यजनतेला वेठीस

ठाणे महापालिका आयुक्त यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतला,शहरातील सर्व अतिक्रमणे काढली होती. तर अनेक ठिकाणी बेकायदा वाहतून आणि रिक्षा थांबा बनवून प्रशासन आणि जनतेची लुट थांबवली होती. मात्र चोराच्या उलट्या बोंबा याप्रकारे रिक्षा चालकांनी चांगल्या कामाविरोधात संप पुकारला आहे. त्यामुळे लोकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जाव लागणार आहे. 
 
आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकांविरोधात केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी संप पुकारण्यात आला आहे. ठाणे शहर ऑटो टॅक्सी संघर्ष कृती समितीने संपाची हाक दिली आहे. पालिका आयुक्तांनी ठाण्यातील फेरीवाले आणि रिक्षा चालकांवर गेल्या दोन आठवड्यांपासून कारवाई सुरु केली आहे. सामन्य जनता आयुक्तांच्या मागे आहे, त्यामुळे मुजोर रिक्षा चालकांचा किती दिवस हा संप चालतो हे पहावे लागेल.