शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (09:33 IST)

बच्चू कडू म्हणतात, 'मी मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही, तो आमचा अधिकार'

bachhu kadu
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे समर्थक आमदार आणि प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू हे मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असल्याची चर्चा होती. अखेर काल अमरावतीत बोलताना बच्चू कडूंनी याबाबत मन मोकळं केलं.
"आमच्यासाठी मंत्रिपद हा फार मोठा विषय नाही. आमच्या कामात मंत्रिपदाची ताकद आहे. तरीसुद्धा आम्ही मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही. तो आमचा अधिकार आहे," असं बच्चू कडू म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील. त्यामुळे त्याची चिंता करायची आवश्यकता नाही. पण मंत्रिपद केव्हा मिळणार हे सांगू शकत नाही. तो माझ्या आटोक्याबाहेरचा विषय आहे."
यावेळी बच्चू कडूंनी मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षाही बोलून दाखवली. प्रहारचे दहा आमदार असते तर येणारा मुख्यमंत्री आमचा असता, असंही कडू म्हणाले.