शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 2 मे 2019 (16:42 IST)

मे महिन्यात जाणून घ्या कोणत्या राज्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहे !

या महिन्यात बँका अकरा दिवस बंद राहणार आहेत. सर्वसामान्यांच्या जीवनातील आणि दररोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बँकेशी संबंध येत असतो. त्यामुळे एखाद्या वेळेस बँक बंद असेल तर त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. मे महिन्यामध्ये अनेक राष्ट्रीय सुट्ट्या आहेत त्यामुळे याकाळात सर्व सरकारी, व्यवसायिक तसेच खाजगी बँका बंद राहतील. या महिन्यात बँकांना जवळपास ११ दिवस सुट्ट्या असणार आहेत मात्र त्या सलग नाहीत.
 
मे महिन्यामध्ये १ मे , परशुराम जयंती, बुद्ध पौर्णिमा , जमात उल विदा यांसारखे सण येत आहेत. त्याशिवाय प्रत्येक महिन्यात बँकेला असणाऱ्या सुट्ट्यांचा यात समावेश आहे. मे महिन्याच्या पहिलीच दिवशी १ मे महाराष्ट्र दिन असल्याने यादिवशी राज्यातील बँका बंद राहतील. महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँका बंदच असतात. ह्या महिन्याचा दुसरा रविवार ११ मे व चौथा २५ मे या तारखेला येत आहे. त्यामुळे या तारखेला बँकांना सुट्ट्या असतील. १८ मे ला बुद्ध पौर्णिमा असल्याने तिसऱ्या शनिवारीही बँका बंद राहतील.
 
रविवारच्या साप्ताहिक सुट्टी ५, १२, १९ आणि २६ या तारखांना बँक बंद असणार आहे.
 
या दिवशी असेल बँकांना सुट्टी –
 
१ मे –  गुरुवार – महाराष्ट्र दिन 
 
७ मे – मंगळवार – परशुराम जयंती – हिमाचल प्रदेश, यूपी , पंजाब, हरियाणा
 
७ मे – मंगळवार – बसवेश्वर जयंती – कर्नाटक
 
८ मे – बुधवार – रवींद्रनाथ टागोर जयंती – पश्चिम बंगाल, त्रिपुरा
 
१६ मे – गुरुवार – राज्य दिवस – सिक्किम
 
१८ मे – शनिवार – बुद्ध पुर्णिमा – सर्व राज्य