1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जुलै 2023 (15:57 IST)

बापूसाहेब परूळेकर यांचे निधन

Bapusaheb Parulekar
रत्नागिरीतील नामवंत वकील आणि माजी खासदार बापूसाहेब परुळेकर यांचे आज सकाळी 8.30च्या दरम्यान 94 वर्षांच्या वयात निधन झाले.  त्यांनी ज्येष्ठांचा मान आणि सर्वांशी नम्रपणाची वागणूक कशी ठेवावी याचा उत्तम आदर्श सर्वांसमोर ठेवला होता. 
 
1977 साली ते खासदार म्हणून निवडून आले. बापूसाहेब परुळेकर यांनी आपल्या अपरंपार कष्टाने, मेहनतीने, प्रामाणिकपणे, शिस्तीने आपले वकिलीचे व्यवसायामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात नक्कीच एक वेगळा आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या पश्चात त्यांची  चार मुले व कुटुंबीय आहते. आज दुपारी 3 वाजता त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरतून निघाली.