मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (21:02 IST)

बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पाला वेग येणार, प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन

मागील काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून काढणाऱ्या कोकणातील बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामास आता गती मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीआणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्यात सोमवारी यासंदर्भात सहमती झाली. सुमारे 4 लाख कोटींच्या या प्रकल्पाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
 
दरम्यान या रत्नागिरी  प्रकल्पामुळे भारत आणि सौदीची मैत्री आणखी दृढ झाली आहे आहे, असं पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले. हा प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे
 
यावेळी बैठकीत हायड्रोकार्बन, संरक्षण, सेमी कंडक्टर आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा झाली. आगामी वर्षात सौदीर अरेबिया भारतात 8.20 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या राजकुमार सलमान यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले.
 
काय आहे बारसू प्रकल्प?
कोकणातील राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प रद्द केल्याच्या अधिसूचनेनंतर आता बारसूतील सोलगाव परिसरात ती 'क्रूड ऑइल रिफायनिंग' कंपनी प्रस्तावित आहे. तेल शुद्धीकरण क्षेत्रातील 'आरामको' या सौदी अरेबियातील क्रूड ऑइल उत्पादित करणाऱ्या कंपनीसोबत केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने हा रिफायनरी प्रकल्प या परिसरात सुमारे 13 हजार एकर जागेवर प्रस्तावित आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor