testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'तिला' व्हायचं पुरुष

बीडच्या जिल्हा पोलिस दलातील एका २७ वर्षीय महिलेच्या शरिरात बदल जाणवत असल्याने तिने चक्‍क पुरुष होण्याची मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. हा विषय अधीक्षकांच्या अधिकारात नसल्यामुळे त्यांनी सदरील महिला कॉन्स्टेबलचा अर्ज पोलिस महासंचालकांकडे पाठविला आहे. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. पोलिस सेवेत कायम राहण्यासाठी हा अर्ज त्या महिलने केला आहे.
बीड जिल्ह्यातील एका ठाण्यात २७ वर्षीय महिला कार्यरत आहे. २००९ मध्ये झालेल्या भरतीमध्ये तिने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन ती पोलिस दलात दाखल झाली. मागील काही वर्षाच्या कालावधीत तिला तिच्या शरिरामध्ये काही बदल जाणवू लागल्याचे सांगण्यात आले. सदरील महिलने डॉक्टरांशी संपर्क साधला.

दरम्यान, एक महिन्यापूर्वी सदरील महिला कॉन्स्टेबलने पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडे पुरुष होण्यासाठीची परवानी मागितली. अधीक्षकांनी याबाबत संपूर्ण माहिती घेऊन सदरील अर्ज पोलिस महासंचालकांकडे पाठविला आहे. यापूर्वी असे प्रकरण कधीही समोर आले नाही. एखादी महिला पोलिस कर्मचारी शस्त्रक्रिया करुन पुरुष झाली तर त्याला सेवेत घ्यावे की नाही याबाब काही शासन निर्णय आहे का याची चाचपणी सध्या सुरु आहे.


यावर अधिक वाचा :