1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

'त्या' तरुणीनेच भय्यू महाराजांना मारलं, आईचा खुलासा

bhaiyyu maharaj death case
भय्यू महाराज यांच्या आत्महत्येच्या ६ महिन्यानंतर त्यांच्या आईने हा खुलासा केला आहे. ड्रायव्हर कैलाश पाटीलने ज्या व्यक्तींवर आरोप केले त्या सगळ्या व्यक्तींवर त्यांच्या आईने देखील आरोप केले आहेत.यात 'ती युवती भय्यूकडे काम करण्यासाठी आली होती. हळूहळू घरात राज्य करायला लागली. ती भय्यूच्या बेडरुममध्येच असायची. कपाटात कपडे ठेवायची. त्याच्याच बाथरुममध्ये अंघोळ करायची. विनायक आणि शेखर देखील तिच्यासोबत या षडयंत्रा सहभागी आहेत. त्यांनी भय्यूला फसवलं आणि ब्लॅकमेल केलं. असा धक्कादायक खुलासा भय्यू महाराज यांच्या ७५ वर्षांच्या आई कुमुदनी देशमुख यांनी केला आहे.
 
जागरणने दिलेल्या बातमीनुसार, भय्यू महाराजांच्या आईने आरोप केला आहे की, 'त्या तरुणीनेच भय्यू महाराजांना मारलं आहे. एकदा भय्यू साधनेसाठी गेला होता. शेखरने त्या मुलीचा उल्लेख केला आणि मला सांगितलं की, महाराज तर त्या तरुणीसोबत फिराय़ला गेले आहेत. तेव्हा मी त्याच्यावर ओरडली तर त्याने मला उलट उत्तर दिलं. तेव्हापासून त्याने माझ्याकडे येणं-जाणं बंदच केलं.'