1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (07:37 IST)

मोठी घोषणा : 'या' विद्यार्थ्यांना आता दुप्पट शिष्यवृत्ती मिळणार

सफाई कामगारांच्या पाल्यांसाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. सफाई कामगारांच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता दुप्पट शिष्यवृत्ती मिळणार आहे. 
 
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या लाभात काही भरीव बदल करण्यात आले असून, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांना पूर्वी प्रतिमहिना ११० रुपये शिष्यवृत्ती मिळत असे ती वाढवून आता प्रतिमहिना २२५ रुपये करण्यात आली आहे. तिसरी ते दहावीतील विद्यार्थ्यांना महिना ११० रुपये मिळत होते. आता ही रक्कम वाढवून २२५ रुपये करण्यात आली आहे. तर वर्षाला मिळणारे एकत्रित मानधन हे पूर्वीप्रमाणे रुपये ७५० इतकेच असणार आहे. विद्यार्थ्यांना पूर्वी वर्षाला १८६० रुपये मिळत, नवीन नियमानुसार झालेल्या वाढीनंतर वर्षाला एकूण ३००० रुपये मिळणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितलं.