शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2019 (19:34 IST)

सर्वच पक्षांमधले मोठी नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुक जोरदार तयारी सर्व पक्षांनी सुरु केली असून, अनेक याद्या आणि इतर पक्षात जाणे आता सुरु झाले आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपच्या नव्या आधुनिक मीडिया रुमचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाल आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी संकेत दिलेत की, सर्वच पक्षांमधले मोठी नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. पुढच्या काळात तुम्हाला ते कळणारच आहे. राज्यात भाजपची स्थित अत्यंत मजबूत हे, 2014 पेक्षाही युतीला जास्त जागा मिळतील अशी स्थिती आहे. तर राज्यात युतीत भाजप, शिवसेनेत कोणतेही मतभेत नाहीत. सर्वच नेते मतभेद विसरून काम करत आहेत. तर भाजपची राज्यातली पहिली यादी लवकरच जाहीर करू असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 
 
कॉग्रेस, राष्ट्रवादी यांच्या आघाडीला पहिला मोठा धक्का देत अहमदनगरमध्ये विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंनी भाजपात प्रवेश घेतला आहे. यानंतर भाजपने मोर्चा सोलापूर जिल्ह्याकडे वळवलाय. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेला आणि हा बालेकिल्ला मजबूत ठेवणारे विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजित सिंह मोहिते पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री यांचे सूचक विधान आणि भाजपात येत असलेले नेते पाहून भाजपा इतर पक्षांना वरचढ ठरत आहे.