शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (15:04 IST)

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस चे 14 नगरसेवक 6 वर्षासाठी निलंबित, पक्षाच्या विरोधात काम केल्याचा आरोप

Big news! 14 NCP corporators suspended for 6 years
उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 14 नगरसेवकांना 6 वर्षासाठी पक्षाच्या विरोधात काम करत असल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले. हे सर्व नगरसेवक भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या समवेत काम करत होते. या नगरसेवकांना 6 वर्षासाठी निलंबित करण्याचा हा निर्णय राष्ट्रवादीने जिल्ह्यातील झालेल्या बैठकीत घेतल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयानंतर उस्मानाबाद मध्ये राजकीय चर्चेला वाट मिळाली आहे. जिल्हा निरीक्षक रमेश बारस्कर यांच्या बैठकीत माजी आमदार राहुल मोटे, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील हे उपस्थित होते. 
 राष्ट्रवादीने निलंबित केलेल्या नगरसेवकांमध्ये नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे, औदुंबर कदम, चंद्रकांत कणे, किशोर साठे, विजय कंदले, विनोद पलंगे, पंडित जगदाळे, नगरसेविका अर्चना विनोद गंगणे, वैशाली कदम, भारती गवळी, अश्विनी रोचकरी, मंजुषा देशमाने, रेशमा गंगणे, आशाताई विनोद पलंगे यांचा समावेश आहे.