भाजपाचे जळगावमधील विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल
भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या जिंतेद्र कंडारेला अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी भाजपाचे जळगावमधील विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील महिनाभरात पुणे पोलिसांच्या गुन्हे विभागातंर्गत येणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेनं जवळपास १३ जणांना अटक केली आहे. यात मुख्य संशयित आरोपी जितेंद्र कंडारेचाही समावेश आहे. या प्रकरणी महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेशातही छापेमारी केली होती.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांनी याविषयी माहिती दिली. “चंदूलाल पटेल यांच्याविरुद्ध मागील महिन्यातच अरेस्ट वॉरंट बजावण्यात आलेलं आहे. छापेमारी करण्यात आल्यानंतर वॉरंट बजावण्यात आलं होतं. पण, ते फरार झाले होते”, अशी माहिती त्यांनी दिली.