रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 जानेवारी 2022 (17:56 IST)

बोलेरो पिकअप व्हॅनच्या अपघातात 4 महिला मजुरांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यात इसापूर -घुबडमेट मार्गावर सकाळी हा अपघात झाला. बोलेरो व्हॅन चालकाचे नियंत्रण वाहनावरून सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.  या वाहनात या परिसरातील संत्रीच्या बागेत महिला मजूर संत्री तोडण्यासाठी जात होत्या. पहाटे चारच्या सुमारास बोलेरो वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकले या अपघातात तीन महिला मजुरांचा जागीच मृत्यू  झाला तर एक अन्य महिला रुग्णालयात नेत असताना मृत्युमुखी झाली. इतर 5 महिला मजुरांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.