शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 20 एप्रिल 2017 (21:22 IST)

सेलिब्रिटींना घरकामगार न पुरवण्याचा 'बुक माय बाई' कंपनीचा निर्णय

कोणत्याही सामाजिक प्रश्नावर उठसूठ ट्वीट करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटी आणि टीव्ही स्टारवर आता गंभीर आरोप होत आहे. या सेलिब्रिटींच्या घरी काम करणाऱ्या नोकरांचा छळ केला जात असल्याचं समोर येत आहे. ‘बुक माय बाई’ या घरकामासाठी माणसं पुरवणाऱ्या कंपनीने हा आरोप केला आहे.

‘बुक माय बाई’ ही कंपनी गरजेप्रमाणे घरकामासाठी महिला किंवा पुरुष सेवक उपलब्ध करुन देण्याची सुविधा देणारी कंपनी आहे. या कंपनीने आतापर्यंत 35 बॉलिवूड, टीव्ही सेलिब्रिटींच्या घरी सेवा दिली आहे. पण यापैकी 26 घरात काम करणाऱ्या नोकर-चाकरांना मारहाण, शिवीगाळ, उपासमार केली जात असल्याची तक्रारी आहेत.

या संदर्भात पोलिस तक्रार करण्याचा प्रयत्नही ही कंपनी करत आहे. मात्र पीडित नोकर पोलिसांत तक्रार नोंदवण्यास घाबरतात, असं कंपनीचं म्हणणं आहे.

त्यामुळे कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटी, टीव्ही कलाकारांच्या घरी सेवा देणार नाही, असा निर्णय कंपनीने घेतला आहे.