1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जानेवारी 2019 (09:07 IST)

रेल्वे तिकीट बुकींगसह साई दर्शनाचे तिकीट बुक करा

आता शिर्डीला जाणाऱ्या साई भक्तांना रेल्वे तिकीटाच्या बुकींगसह साई बाबांचे दर्शन घेण्यासाठीही तिकीट बुक करता येणार आहे. भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे दर वर्षी करोडोंच्या संख्येने जाणाऱ्या भक्तांना खास सुविधा मिळेल. रेल्वेच्या या नवीन योजने अंतर्गत साईंच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना दर्शनासाठी तिकीट बुक करण्यासाठी सुविधा काही निवडक स्थानकांवरच देण्यात येणार आहे. साई भक्तांसाठी रेल्वेकडून देण्यात येणारी ही सुविधा येत्या २६ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.
 
शिर्डी साई नगर, कोपरगाव, मनमाड, नाशिक आणि नागरसोल या स्थानकांचे ई-तिकीट बुक करतानाच भक्त साईंच्या दर्शनासाठी ऑनलाईन तिकीट बुक करू शकतात. या सुविधेमुळे भक्तांना मंदिर परिसरात दर्शनासाठी लांब रांगेत उभे राहण्याची गरज असणार नाही. दर्शनासाठी ऑनलाईन तिकीटाची वैधता ट्रेन स्थानकांत पोहचल्यानंतर पुढील ४८ तासांपर्यंत असणार आहे.