मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 एप्रिल 2022 (08:20 IST)

चेक बाऊन्स करणे पडले महागात चक्क २ वर्षे सक्तमजुरी ; ५९ लाख रुपये दंड भरपाईचा आदेश…

Srigonda
अहमदनगर आपण अनेकदा पैशाचे व्यवहार करताना चेकने करतो. श्रीगोंदा येथील खरेदी विक्री संघाचे संचालक प्रकाश दादासाहेब निंभोरे यांच्यावर कर्ज परतफेड प्रकरणी दिलेला २९ लाख रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी श्रीगोंदा येथील कोर्टाने २ वर्षे सक्तमजुरी शिक्षा व ५९ लाख रुपये दंड भरपाई देण्याचा निकाल दिला.
 
निंभोरे यांनी येथील वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट को-ऑप सोसायटी मधून १ वर्ष मुदतीसाठी २५ लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र वेळेवर हफ्ते न भरल्याने वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट ने हफ्ते भरण्यास सांगितले असता
निंभोरे यांनी २९ लाख रुपयांचा बँक ऑफ इंडिया श्रीगोंदा शाखेचा धनादेश दिला सदर धनादेश न वटल्याने वृद्धेश्वर मल्टिस्टेटने कोर्टात दावा दाखल केला. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला.