Buldhana :बुलढाण्यात स्वाईन फ्लू ने तरुणाचा मृत्यू
बुलडाणा जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या स्वाईन फ्लू रुग्णाचा मध्यरात्रीच्या दरम्यान मृत्यू झाला आहे. बुलडाणा शहरातील इकबाल चौकात राहणाऱ्या एका 32 वर्षीय तरुणाला आठ दिवसांपूर्वी स्वाईन फ्लू आजाराची लागण झाली होती. त्याला बुलडाणा येथील जिल्हा महिला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सुरुवातीला त्याची दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात आली. परंतु ही टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्याचा स्वॅब पुणे एनआयव्ही ला पाठविण्यात आला होता. तर या तरुणाला कोरोना नव्हे तर स्वाईन फ्लू ची लागण लागली होती. त्याची लक्षणें गंभीर असल्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.