गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पंढरपूरच्या कायापालटसाठी कॅनडा सरकार देणार निधी

कॅनडा सरकार हवा तेवढा निधी देण्यास इच्छुक असून शहर विकासाचा आराखडा तयार करा आणि आम्ही पंढरपूरचा कायापालट करू, अशी ग्वाही कॅनडाचे कॉन्सिल जनरल जॉर्डन रेव्हीज यांनी दिली.
 
भारत व कॅनडा यांच्या मैत्रीला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या दोन देशांच्या कराराअंतर्गत तीर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास करण्याबाबत चर्चा सुरू आहे. याची प्राथमिक पाहणी करण्यासाठी कॅनडा प्रशासनाचे रेव्हीज व त्यांच्या सहकारी शूवॉटर तारा अँजला हे पंढरीच्या दौर्‍यावार आले होते. या पथकाने प्रथम श्री विठ्ठल-रूक्मिणीजे दर्शन घेऊन मंदिरापासून चालत महाद्वारा घाटापर्यत पाहणी केली. नंतर संत तुकराम भवन येथे विविध महाराज मंडळी व सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्‍यात आला.
 
पत्रकार परिषदेमध्ये उपक्रमाविषयी माहिती देताना जॉर्डन यांनी शहर विकासासाठी देण्यात येणारी ही रक्कम कर्जाऊ स्वरूपात असल्याचा खुलासा केला परंतू यासाठी दीर्घ मुदतीमध्ये अत्यंत कमी दरात व्याजदार आकारले जाणार आहे.