शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: टिटवाळा , गुरूवार, 22 जुलै 2021 (19:56 IST)

खडवली नदीत चाललाय मृतदेह वाहून

राज्यभरात अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याच्या बातम्या समोर येत आहे. दरम्यान खडवली नदीत एक मृतदेह वाहून जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. टिटवाळा पोलिसांना या व्हिडिओ संबंधी माहिती मिळाली आहे. मात्र हा मृतदेह कोणाचा आहे, तसेच तो कुठून आलाय या संबंधी कोणतीही तक्रार अथवा माहिती नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा मृतदेह कोणाचा होता आणि तो कुठून वाहून आला यासंदर्भातील माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. 
 
गेल्या अनेक दिवसांपासून कोकणात पावसाचं (Heavy rain in Konkan) धुमशान सुरू आहे. अतिवृष्टीमुळे कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहे. अनेक भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोकणातील गावांमध्ये सोडण्यात येणारा कोयनेचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय कोयनेतून वीजनिर्मिती तात्पुरती बंद केली आहे.