शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 डिसेंबर 2019 (10:35 IST)

मध्य रेल्वेची पहिली वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल होणार

येत्या दोन दिवसांत मध्य रेल्वेवर चालवण्यात येणारी पहिली वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल होणार आहे. ही लोकल कुर्ला कारशेडमध्ये येईल. या लोकलची बांधणी रेल्वे मंत्रालयाच्या चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल चालवण्याचे नियोजन केले जात आहे. काही दिवस चाचणी केल्यानंतर ही लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
 
ही लोकल बारा डब्याची असून  वातानुकूलित आहे. स्टेनलेस बॉडी,  स्वयंचलित दरवाजे, मोठय़ा काचेच्या खिडक्या, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात प्रवेश करता येणार आहे. प्रवाशांना लोकलच्या गार्ड आणि मोटरमनशी संपर्क साधता यावा यासाठी डब्यात टॉक बॅक यंत्रणा आहे.  याशिवाय स्वयंचलित चेतावणी देणारी अलार्म यंत्रणा आणि दरवाजा न उघडल्यास प्रवासीही दरवाजा उघडू शकतील अशी व्यवस्था आहे.