गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जुलै 2022 (09:12 IST)

काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे शिंदे गटात जाणार,दिले त्यांनीच उत्तर

Congress candidate
Photo- Socal Media विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्याने ते नाराज आहेत. विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगमुळे महाविकास आघाडीला फटका बसला. काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या निवडणुकीत संख्याबळ नसतानाही भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड निवडून आले. या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले. आता नाराज असलेले चंद्रकांत हंडोरे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत स्वकीयांकडूनच दगाफटका झाल्यानंतर माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. विशेषतः ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या गटात सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याबाबत हंडोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

हंडोरे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर काँग्रेसनं मला सगळं काही दिले आहे. त्यामुळे या चर्चांना अर्थ नाही. अशाप्रकारे खोडसाळ वृत्त समोर आले आहे. मी काँग्रेसमध्ये आहे असं स्पष्टीकरण चंद्रकांत हंडोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिले.