मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 जुलै 2022 (08:58 IST)

चंद्रकांत पाटलांना मंत्रिमंडळात स्थान नाही…?

chandrakant patil
राज्यात मविआ सरकार बरखास्त झालं आणि भाजपा- शिवसेना सरकार स्थापन झालं. विजयाचा जल्लोष साजरा करत नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान आज भाजपचे नेते राहुल नार्वेकर  हे विधानसभेच्या अध्यक्षपदी निवडून आले. यामुळे भाजपला दुधात साखर पडल्याचा फिल येत असेल. मात्र ज्यांनी हे सगळं घडावं म्हणून मेहनत घेतली त्यांचा पत्ता कट झाला की काय़ असा सवाल उपस्थित केला. ”मी पुन्हा येईन” हे ब्रीद वाक्य घेऊन डंका पिटणारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांना साथ देणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपा महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. सेनेच्य़ा बंडखोर आमदारांनी बंड केल्यानंतर त्यांना आपल्याकडे वळवत भाजपाची ताकद वाढवण्याचे काम केलं. मात्र यातून चंद्रकांत दादांचाचं पत्ता कट करण्य़ात आला का? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळावे असे स्वप्न पाहणाऱ्या फडणवीसांना  उपमुख्यमंत्रीपद देवून धक्का देण्यात आला. यामुळे भाजपामध्ये काहीतरी गडबडं असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.