1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (08:29 IST)

‘नेट’च्या वेळापत्रकात बदल

Changes to the Net's schedule Maharashtra News Regional Marathi News
सहायक प्राध्यापक होण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (नेट) वेळापत्रकात राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून (एनटीए) पुन्हा बदल करण्यात आला आहे. नेटचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून आता १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत ही परीक्षा होईल.
 
एनटीएकडून ६ ते ८ ऑक्टोबर आणि १७ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत नेट परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र या कालावधीत अन्य काही परीक्षा होणार असल्याने नेटच्या वेळापत्रक बदल करण्यात आल्याचे स्पष्ट करून एनटीएकडून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्याबाबतची माहिती एनटीएने संके तस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता नेट परीक्षा १७ ते २५ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. तसेच काही तक्रारी अथवा आक्षेप असल्यास संकेतस्थळावरील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.