सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (21:04 IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कराड दौरा अचानक रद्द

eknath shinde
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची  पुण्यतिथी असून, साताऱ्यातील कराडमध्ये असलेल्या त्यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेण्यासाठी अनेक नेतेमंडळी पोहचले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेण्यासाठी येणार होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदेंचा कराड दौरा अचानक रद्द झाला असल्याचे समोर येत आहे. प्रकृती ठीक नसल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती आहे.
 
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे साताऱ्यातील कराडमध्ये त्यांच्या स्मृतिस्थळी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते. तर, आज सकाळपासून अनेक नेतेमंडळी कराडमध्ये दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.
 
विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील  कराडमध्ये येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी दर्शन घेण्यासाठी येणार होते. त्यांचा शासकीय दौरा देखील निश्चित झाला होता. त्यानुसार स्थानिक प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती. पण, मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने आणि त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांचा दौरा रद्द झाला असल्याची समजतेय.