रविवार, 28 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुख्यमंत्री ही पाहणार 'तान्हाजी'

Chief Minister to see 'Tanhaji'
मुंबईतील प्लाझा या चित्रपटगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजय देवगण हे दोघे तान्हाजी हा सिनेमा पाहणार आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांसाठी तान्हाजी सिनेमाचा शो आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगण हे मंगळवारी तान्हाजी हा सिनेमा पाहणार आहेत. 
 
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही सोमवारी शहरातील सेंटर मॉल या ठिकाणी तान्हाजी हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर छगन भुजबळ यांनी तान्हाजीच्या पोस्टरपुढे उभं राहून सेल्फीही काढला.