1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (11:29 IST)

नऊ वर्षांची नवरी

child marriage
मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे नऊ वर्षांच्या बालिकेचा विवाह 21 वर्षांच्या मुलासोबत लावण्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नवदेवासह त्याचे आई वडील आणि मुलीच्या आईवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलगी व तिची आई बेपत्ता आहे.  
 
ही घटना 30 नोव्हेंबर रोजी एका नऊ वर्षांच्या मुलीबरोबर कोन्हेरीयेथील नात्यातीलच अविनाश शेळके याचा विवाह लावून देण्यात आला होता, दरम्यान हे नवविवाहित जोडपे देवदर्शनासाठी गेले होते. त्या ठिकाणचे काही फोटो नवरदेवाने त्याचा मोबाईलवर स्टेटस ठेवले होते. त्या फोटोंचा स्क्रीनशॉट काढून एका व्यक्तीने महिला बालविकास कार्यालयातील 'चाइल्डलाइन'च्या क्रमांकावर फोन करीत या बालविवाहाची माहिती दिली होती.