मंगळवार, 23 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 फेब्रुवारी 2023 (08:07 IST)

शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्टच्या विरोधात तक्रार

Complaint against Shiv Sena Bhavan
शिवसेना भवनावर (Shiv Sena Bhawan) दावा केला जाऊ शकतो, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु असताना ठाकरे गटाची डोकेदुखी वाढवणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शिवसेना भवनाच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आलीय. त्यामुळे शिवसेना भवनाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात काय घडामोडी घडतात, हे पाहणं सर्वात महत्त्वाचं असणार आहे. सामाजिक कार्यकर्ते योगेश देशपांडे (Yogesh Deshpande) यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. एखाद्या ट्रस्टची जागा शिवसेना भवनाला कशी दिली? असा प्रश्न त्यांनी तक्रारीत उपस्थित केलाय. योगेश देशपांडे यांनी शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्टच्या विरोधात तक्रार केलीय.
 
योगेश देशपांडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला याबाबत प्रतिक्रिया दिलीय. न्यूजमध्ये माहिती मिळाली की, शिवसेना भवनाची जागा ही शिवसेनेची नसून शिवाई ट्रस्टची आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊन तक्रार दाखल केलीय. कारण पब्लिक ट्रस्ट जागा रेंट आऊट करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया योगेश देशपांडे यांनी दिली.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor